आमच्याबद्दल

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) अहमदनगरची स्थापना १९९७ मध्ये शासकीय डी.एड. कॉलेज संगमनेर (जि. अहमदनगर) चे DIET मध्ये रूपांतर करून करण्यात आली. सुरुवातीस ही संस्था जुन्या इमारतीत कार्यरत होती, परंतु २०११ साली नवीन ५.२७ एकर क्षेत्रफळाच्या प्रशस्त इमारतीत स्थलांतरित झाली. ही संस्था संगमनेर शहरात असून, अहमदनगरपासून सुमारे १०० किमी अंतरावर नाशिक–पुणे महामार्गावर वसलेली आहे.

DIET Ahilyanagar Building

दृष्टीकोन

राष्ट्रीय शिक्षण धोरण (NPE 1986) नुसार, जिल्हा स्तरावर शैक्षणिक गुणवत्तेचे केंद्र म्हणून DIET संस्था कार्यरत राहावी हा उद्देश आहे. जिल्हास्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संसाधन केंद्र म्हणून DIET उभारी घेऊ शकते.

ध्येय

प्राथमिक व शालेय शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांच्या यशासाठी स्थानिक स्तरावर शैक्षणिक संसाधन सहाय्य पुरवणे. RTE कायदा, RMSA, NCF च्या पार्श्वभूमीवर DIET ची जबाबदारी केवळ शिक्षक प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून शाळांमधील गुणवत्तेचे व्यवस्थापन, शिक्षकांचा व्यावसायिक विकास, जिल्ह्यातील शैक्षणिक समन्वय, मूल्यमापन, संशोधन, ICT वापर आणि अभिनव प्रयोग यामध्ये आहे.

महत्वाच्या व्यक्ती

मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन

मा.राज्यपाल

मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन

मा.राज्यपाल

मा. श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

मा. श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

मा. श्री एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

मा. श्री एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

मा. श्री अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

मा. श्री अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

मा. श्री दादा भुसे

मा.शिक्षणमंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग )

मा. श्री दादा भुसे

मा.शिक्षणमंत्री

डॉ. पंकज राजेश भोयर

मा. शिक्षण राज्यमंत्री (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभाग )

डॉ. पंकज राजेश भोयर

मा. शिक्षण राज्यमंत्री

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था

मा. रणजितसिंह देओल

अप्पर मुख्य सचिव

मा. रणजितसिंह देओल

अप्पर मुख्य सचिव

मा. सचिंद्र प्रताप सिंह

आयुक्त, शिक्षण

मा. सचिंद्र प्रताप सिंह

आयुक्त, शिक्षण

मा. राहुल रेखावार

संचालक, SCERT, पुणे

मा. राहुल रेखावार

संचालक, SCERT, पुणे

श्री. राजेश बनकर

प्राचार्य

श्री. राजेश बनकर

प्राचार्य

DIET, संगमनेर कार्यालयीन व शैक्षणिक माहिती

  • संस्थेचा भविष्यवेधी दृष्टीकोन
  • कार्यालयीन सहकारी
  • गट साधन केंद्र
  • नियोजन
  • यशोगाथा
  • अहवाल/ प्रकाशाने
  • राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण
  • महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

विभाग

(२७ जून २०१८ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णयानुसार )

अ.क्र.

विभाग

शिक्षक शिक्षण विभाग
मराठी, इंग्रजी, गणित, उर्दू, विज्ञान, सामाजिक शास्त्र
व्यवसाय विषय शिक्षण, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण (सीपीडी), व्यवसाय मार्गदर्शन व समुदेशन विभाग
संशोधन, क्षेत्रीय आंतरक्रिया, समता विभाग
अभ्यासक्रम विकसन व मूल्यमापन, शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञान , संदर्भ साहित्य विकसन विभाग

Our Mission

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक १ ली ते १२ वी पर्यतच्या विद्यार्थ्यांला २१ व्या शतकात आवश्यक कौशल्ये प्राप्त करुन देण्यासाठी शैक्षणिक सहाय्य करणे व पुढिल उज्वल भविष्यासाठी एक सुजान नागरिक निर्माण होण्यासाठी सहाय्य करणे.

संस्थेचा भविष्यवेधी दृष्टीकोन

  • प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे.
  • माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्यास संधी देणे.
  • शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास संधी देणे.शालेय अध्ययन- अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करणे.
  • शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संदर्भ सेवा सुविधा पुरवणे.
  • शासनाच्या योजनाची परिणामकारक अंमलबजावणी करणे.
  • ज्ञानरचनावादी अध्यापनासाठी प्रभावी नियोजन व कार्यवाही करणे.
  • अंगणवाडी ताईना शैक्षणिक गुणवत्तेसाठी आधार देणे.
  • सामाजिक संस्थेच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.
  • दिव्यांग बालकासाठी विशेष मदत व अध्ययन पूरक उपक्रमाची नियोजन व अमलबजावणी करणे.
सविस्तर वाचा



संस्थेने मागील वर्षात घेतलेले उपक्रम

  • अध्ययन स्तर निश्चिती
  • १०० टक्के विद्यार्थ्यांचा पायाभूत वाचन कार्यक्रम
  • गणित संबोध कार्यशाळा
  • विषय सहायकसाठी MSRG प्रशिक्षण कार्यक्रम
  • पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण
  • निर्धारकासाठी शालासिद्धी प्रशिक्षण कार्यक्रम
  • माध्य. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम
  • ALP उपक्रमाची कार्यवाही
  • डी. एल. एड. अध्यापकाचार्य प्रशिक्षण
  • शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण
  • संशोधन व अनुधावन कार्यक्रम
  • दत्तक केंद्र/बीट/तालुका –प्रगत करणेकामी कार्यवाही
  • शालाभेटी व मार्गदर्शन
  • शैक्षणिक अभ्यास दौरा
  • राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण ३ री , ५ वी, ८ वी, १० वी
  • माध्यमिक शिक्षका/मुख्याध्यापक यांचेसाठी अविरत ऑनलाईन प्रशिक्षण
  • प्राथमिक इंग्रजी शिक्षकासाठी TAG व माध्यमिक शिक्षकासाठी CHESS प्रशिक्षण कार्यक्रम
  • मूल्यवर्धन प्रशिक्षण
  • नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र्व शालाभेटी
  • बालरक्षक चळवळ व प्रशिक्षण
  • शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण
  • लोकसंख्या शिक्षण अंतर्गत सांस्कृतिक स्पर्धा
  • समावेशित शिक्षण- अध्ययन- अध्यापन व प्रशिक्षण कार्यक्रम
  • मागणीनुसार शिक्षकांना मुलभूत गणित संबोध व पायाभूत वाचन प्रशिक्षण कार्यक्रम
  • पर्यवेक्षीय अधिकारी यांना प्रशिक्षण

श्री. राजेश बनकर

प्राचार्य
Shri. Bankar Sir

श्री. राजेश बनकर

प्राचार्य - मनोगत


शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने नियोजनबद्ध व योग्य पद्धतीने कार्य करीत राहणे आवश्यक आहे. या शाळांमधून घडणारी मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. शाळेतून घडणारे उद्याचे नागरिक हे शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम राहतील या दृष्टीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर ही संस्था शिक्षण विभागाशी संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अत्यंत तळमळीचे कार्य करीत आहे. शासनाच्या शिक्षण विषयक सर्व योजना, सर्व संकल्प, शिक्षण विभागाशी संबंधित कायदे, नियम, सूचना, परिपत्रके व विविध स्तरावरील नियोजन यानुसार शैक्षणिक प्रगतीसाठी सर्व पर्यवेक्षीत यंत्रणा सर्व शिक्षक बांधवाना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. यासाठी शिक्षक संघटना, पदाधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी मनःपूर्वक व तेवढ्याच आत्मीयतेने आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे. जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील प्रत्येक मूल या शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे. त्याला किमान पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंत दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व पर्यवेक्षीय यंत्रणेचे सक्षमीकरण करून प्रत्येक मुलाला गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.